संगमेश्वर : करंबेळेतर्फे देवळेतील विद्युत खांब धोकादायक

संगमेश्वर : तालुक्यातील करंबेळेतर्फे देवळे मिरगलवाडी येथे मुख्य पायवाटेजवळील लोखंडी विद्युत खांब धोकादायक स्थितीत आहे. वादळी पावसात याचा अधिक धोका वाढू शकतो.

येथील मुख्य पायवाटेवरुन वाडीतील शेतकरी, विद्यार्थी व ग्रामस्थ सतत ये-जा करतात. येथे असलेला लोखंडी खांब गंजलेला असल्याने तो धोकादायक आहे. याबाबत संबंधित कार्यालयात संपर्क करूनही याकडे दुर्लक्ष केले जाते, असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सध्या तालुक्यात सर्वत्र जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसात जमीन सैल झाल्यास हा खांब कधीही पडू शकतो.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:28 AM 27/May/2025