रत्नागिरी : गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर उद्भवलेली परिस्थिती व धोकादायक ठिकाणे, घाट परिसर, पूल, रस्ते आदीची जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष एम. देवेंदर सिंह यांनी पाहणी केली. संबंधित विभागांना सुरक्षिततेच्या दृष्टीने व धोकादायक ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाय करण्याबाबत योग्य सूचना दिल्या.
तहसील कार्यालय लांजा येथील नियंत्रण कक्षाला भेट देऊन आढावा घेतला. लांजा तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मॉन्सून काळात घ्यावयाची दक्षता याबाबत संबंधित विभागांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या. जिल्हाधिकारी काळ तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेऊन राजापूर तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. धोकादायक, दरडप्रवण क्षेत्रात व पूर परिस्थितीमध्ये घ्यावयाची दक्षता याबाबत संबंधित विभागांना सूचना दिल्या. त्याचप्रमाणे राजापूर शहरातील पूर परिस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणाला भेट देऊन पाहणी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 27/May/2025














