राजापूर : कीटकनाशक प्राशन केल्याने व्यक्तीचा मृत्यू, दारूच्या नशेत उचलले टोकाचे पाऊल

राजापूर : राजापूर तालुक्यातील सोलगाव येथील ५६ वर्षीय आत्माराम वासुदेव थोटम यांचा कीटकनाशक प्राशन केल्याने मृत्यू झाला आहे. दारूच्या नशेत त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान ६ मे २०२५ रोजी रात्री ९.१५ वाजता त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम थोटम यांनी ३ मे २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्यापूर्वी दारूच्या नशेत आंबा फवारणीचे कीटकनाशक औषध प्राशन केले. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारांसाठी त्यांना रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले.

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना, ६ मे २०२५ रोजी रात्री ९.१५ वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेमुळे सोलगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत आत्माराम थोटम हे खबर देणाऱ्या व्यक्तीचे चुलते असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये २५ मे २०२५ रोजी दुपारी १.४७ वाजता आकस्मिक मृत्यू क्रमांक २९/२०२५ बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 27-05-2025