रत्नागिरी : गेला आठवडाभर कोकण किनारपट्टी भागासह रत्नागिरी जिल्ह्यात असलेले परतीच्या पावसाचे सातत्य दसऱ्यालाही कायम राहणार असल्याने किनारपट्टी भागात जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ कायम करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री हलक्या अवकाळी सरी झाल्या तर शुक्रवारी सकाळी मळभाच्या अच्छादनात वातावरणात पावसाळी वातावरण कायम होते. तसेच आज शनिवारीही साजऱ्या होणाऱ्या दसऱ्याला पावसाचे सावट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
किनारपट्टी भागात चक्राकार वान्याच्या प्रभावाने उत्तर कोकणापासून अरबी सागरालगत वातावरणात मळभ आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात असलेला ‘ऑक्टोबर हिट’चा प्रभावर काहीसा कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून, सायंकाळी पावसाचा जोर वाढू लागला आहे. या पावसामुळे वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. गुरुवारी पावसाने दिवसा विश्रांती घेतली होती. मात्र, रात्री हलक्या सरी झाल्या, त्यामुळे शुक्रवारी पहाटे झालेल्या पावसाने हवेत गारवा निर्माण झाला.
सप्टेंबर संपताच आता पावसाच्या परतीची लक्षणे दिसू लागली आहेत. मेघगर्जनेसह, विजांच्या कडकडाटात सायंकाळी पावसाचा जोर वाढू लागला आहे. गेले दोन दिवस रात्रभर पावसाचे सातत्य होते. मात्र, शुक्रवारी सायंकाळी पावसाने काही काळ हलक्या सरींनी हजेरी लावली होती. त्यामुळे दिवसभर वातावरणात चांगलाच निर्माण झाला आहे. शुक्रवारी दिवसभर मळभाचे वातावरण होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:12 12-10-2024