पावस-दखनीमोहल्ला येथे संरक्षक भिंत कोसळली

पावस : मॉन्सूनपूर्व पावसाने दमदार सुरुवात केल्याने रविवारी रात्री वादळीवाऱ्यासह पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

रविवारी झालेल्या वादळी पावसामध्ये दखनीमोहल्ला म्हालदारवाडी येथील खालिद कासम पटेल यांच्या घराजवळील संरक्षक भिंत कोसळली. मात्र, कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच गोळप येथील हरिश्चंद्र गोरिवले यांच्या शेतीमधील केळीपिकाचे आणि रातांबे यांचे काल रात्री झालेल्या वादळी पावसामुळे नुकसान झाले आहे. यामध्ये त्यांचे दहा ते पंधरा हजारांचे नुकसान झाले आहे. नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 27/May/2025