बेपत्ता वृद्धाचा मृतदेह मिऱ्याबंदर किनारी

रत्नागिरी : शहरालगतच्या मिऱ्याबंदर समुद्रकिनारी प्रौढाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. सोमवारी सकाळी स्थानिक रहिवाशांना ही बाब निदर्शनास येताच त्यांनी शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली.

हा मृतदेह बेपत्ता झालेल्या सुधाकर मधुकर रसाळ (वय ५२, रा. टीआरपी, पांडवनगर, रत्नागिरी) यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुधाकर रसाळ हे २३ मे २०२५ ला राहत्या घरातून बेपत्ता झाले होते. या संबंधी नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. सुधाकर रसाळ यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 27-05-2025