गुहागर : श्रृंगारतळी बाजारपेठेतील बसस्थानकाजवळ वाहतूक कोंडी

गुहागर : गुहागर-विजापूर महामार्गावरील श्रृंगारतळी बाजारपेठेतील बसस्थानकाजवळ झालेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना काही काळ मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. गुहागर एस.टी. आगारातून सुटणाऱ्या आणि श्रृंगारतळीमार्गे चिपळूण व इतर ठिकाणी जाणाऱ्या एस.टी. बसेस रस्त्याच्या मधोमध दोन्ही बाजूने उभ्या राहत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होते.

या वाहतूक कोंडीचा फटका रुग्णवाहिकेलाही बसला. गुहागर येथून रुग्णाला घेऊन जाणारी एक रुग्णवाहिका श्रृंगारतळी येथे याच कोंडीत काही काळ अडकून पडली होती. त्यावेळी उपस्थित काही नागरिकांनी भर पावसात वाहतूक सुरळीत करून रुग्णवाहिकेला मार्ग मोकळा करून दिला. श्रृंगारतळी येथे सातत्याने होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले असून, यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांमधून जोर धरत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 AM 27/May/2025