लांजा : तालुक्यातील कुंभारवाडी, प्रभानवल्ली येथील तरुणाचा फिट येऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रमोद गणपत मंयर (४८) असे मृत्य झालेल्या तरुणाचे नाव आहे. रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद मंयर यांना २१ मे रोजी अचानक फिट आली होती. त्यावेळी त्यांच्या तोंडावर पाणी मारल्यानंतर त्यांना बरे वाटले. मात्र, त्याच रात्री १२ वाजण्याच्या सुमारास त्यांना पुन्हा फिट आली. रात्री कोणतेही वाहन उपलब्ध नसल्यामुळे त्यांना २२ मे रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास एका खाजगी वाहनाने प्रथम लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
लांजा येथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांची तब्येत अधिक बिघडल्याचे पाहून पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच दुपारी ४.२० वाजता त्यांचा मृत्यू झाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 27/May/2025














