देवरूख : तहसीलदारांच्या दालनातील छताचे प्लास्टर निखळले

देवरूख : येथील तहसील कार्यालय इमारतीतील संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार यांच्या दालनातील छताचे प्लास्टर कोसळले. या विभागात कामयस्वरूपी वर्दळ असते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी यावर उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

देवरूख तहसील कार्यालयात एकाच ठिकाणी सर्व विभाग यावेत यासाठी तहसील कार्यालयाची नवी इमारत बांधल्यामुळे नागरिकांची होणारी धावपळ कमी झाली आहे. या इमारतीचे भूमीपूजन २००९ मध्ये तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. इमारत उभारण्याला नऊ वर्षांचा कालावधी लागला.

इमारतीचा उद्घाटन सोहळा तत्कालीन पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते २०१८ मध्ये झाला; परंतु काही वर्षातच या इमारतीला गळती लागली होती. त्यामुळे पत्र्याची शेड उभारण्यात येऊन ही गळती थांबवण्यात आली. याच इमारतीमध्ये असलेल्या संजय गांधी विभागाचे नायब तहसीलदार यांच्या दालनातील छताचे प्लास्टर पडले. या इमारतीमध्ये कायमस्वरूपी वर्दळ असते. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विभागाच्या छताचे काम तत्काळ करावे, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 27/May/2025