गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील जयगड पेठ बौद्धवाडी येथील तक्षशिला बुद्धविहार या वास्तूचे नूतनीकरण व सुशोभीकरण नव्याने करण्यात आले आहे. या सुशोभीत बुद्धविहारामध्ये दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी अशोका विजयादशमीच्या पवित्र दिनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा भव्य दिव्य प्रतिष्ठापना कार्यक्रम बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ९ पेठ बौद्धवाडी स्थानिक व मुंबई भावकी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम शनिवारी बारा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता रत्नागिरी परटवणे अशोकनगर येथील ज्येष्ठ बौद्धाचार्य श्रामनेर तथा विपश्यना साधक आणि रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीच्या संस्कार समितीचे अध्यक्ष आयु. संजय आयरे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली व प्रबोधनात्मक धम्म प्रवचनाने आणि बौद्धाचार्य वैभव पवार, रमाकांत पवार, अजय जाधव व किरण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तसेच हा कार्यक्रम जयगड पेठ बौद्धवाडी येथील स्थानिक व मुंबई भावकीचे प्रमुख पदाधिकारी आणि समस्त सभासदांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम बुद्धमूर्तीची भव्य दिव्य मिरवणूक, त्यानंतर प्रतिष्ठापना प्रतिष्ठापना, बुद्ध वंदना, धम्म प्रवचन, मान्यवरांचे मनोगत सत्कार समारंभ आणि आभार प्रदर्शन अशा स्वरूपात होणार आहे.
या कार्यक्रमाला रत्नागिरी तालुक्यातील व बावीस खेडी बौद्धजन सेवा संघाच्या अखत्यारित असलेल्या गाव शाखांचे प्रतिनिधी व धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जयगड पेठ बौद्धवाडी येथील तक्षशिला बुद्धविहार सुशोभीकरण समितीने केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 12-10-2024














