संगमेश्वर कृषी विभागातील पदे रिक्त

देवरूख : महाराष्ट्र शासनाच्या संगमेश्वर तालुका कृषी विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने ऐन शेती हंगामात शेतकरी वर्गाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळत नसल्याने व लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देत नसल्याने तालुक्यातील शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयात अनेक पदे रिक्त आहेत. या कार्यालयातील संगमेश्वर तालुका कृषी अधिकारी पद गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त आहे. तालुका कृषी अधिकारी पदासह सहाय्यक कृषी अधिकारी पर्यवेक्षक दोन पद रिक्त, लिपिक पद चार असून तीन पदे रिक्त, ३७ कृषी सहाय्यक पदे आहेत त्यातील १६ पद रिक्त आहेत.

या कार्यालयातील अनेक पदे रिक्त असल्याने शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी करताना अतिरिक्त पदभार सोपवलेल्या कर्मचारीवर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाला अनेक लाभापासून वंचित राहावे लागत असून, कामकाजाचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ही रिक्त पदे भरली जावीत व सर्वसामान्य शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी प्रयत्नशील न राहता कानाडोळा करत दुर्लक्ष करत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 PM 27/May/2025