रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला : मंडणगडात सर्वाधिक १५७ मिमी पावसाची नोंद!

रत्नागिरी, ता. २७ मे २०२५: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आज, २७ मे रोजी पावसाने चांगलाच जोर पकडला आहे. जिल्ह्याभरात एकूण ८७२.५१ मिमी पावसाची नोंद झाली असून, सरासरी पाऊस ९६.९४ मिमी इतका आहे. यामध्ये मंडणगड तालुक्यात सर्वाधिक १५७.०० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी:
आज सकाळी नोंदवलेल्या आकडेवारीनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये झालेला पाऊस खालीलप्रमाणे :

मंडणगड: १५७.०० मिमी, दापोली: १४१.७१ मिमी, गुहागर: १२३.०० मिमी, रत्नागिरी: ९८.७७ मिमी, चिपळूण: ८१.११ मिमी, खेड: ७७.८५ मिमी, राजापूर: ७३.३७ मिमी, लांजा: ६७.२० मिमी, संगमेश्वर: ५२.५० मिमी
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. शेतीच्या कामांना गती येणार असून, नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 27-05-2025