चिपळूणमध्ये एनडीआरएफची टीम दाखल

चिपळूण : संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (एनडीआरएफ) टीम क्रमांक ५ आज सकाळी चिपळूण येथे दाखल झाली आहे. एकूण २५ जवानांचा समावेश असलेली ही टीम सज्ज झाली आहे.

या टीममध्ये १ कमांडर, १ सब ऑर्डिनेंट ऑफिसर आणि २३ कॉन्स्टेबल व हेड कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करण्यासाठी आणि बचाव कार्य करण्यासाठी ही टीम महत्त्वाची भूमिका बजावेल.

या टीमचे प्रभारी एएसआय सतीश देसाई असून, त्यांचे संपर्क क्रमांक ८०८०६०५३७१ आणि ८२७५३५९७२९ असे आहेत. स्थानिक प्रशासनासोबत समन्वय साधून ही टीम काम करेल.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:07 PM 27/May/2025