साखरपा : मृग नक्षत्राच्या आगमनाची वर्दी देणारे मृग कीटकांचे दर्शन यंदा मृग नक्षत्र सुरू होण्याआधीच झाले आहे. गेले काही दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे या कीटकांचे आगमन शेतातून झाले आहे.
मृग नक्षत्र हे जूनच्या सात तारखेच्या दरम्यान सुरू होते. त्याचवेळी जमिनीवर ठिकठिकाणी मृग हे अष्टपाद कीटक दिसत असत. लाल रंगाचे, वेलवेटसारखी पाठ असलेले हे कीटक अत्यंत आकर्षक दिसत असत. हे कीटक दिसले की, शेतकऱ्यांना मृग नक्षत्राच्या आगमनाची खात्री पटत असे. हे कीटक जमिनीतून कसे येतात आणि नेमके मृग नक्षत्रात कसे येतात, याबाबत लोकांना खूप कुतूहल आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 27-05-2025














