रत्नागिरी : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील कर्हाडे ब्राह्मण ज्ञातीमधील ज्या विद्यार्थ्यांना विविध परीक्षांमध्ये स्पृहणीय यश मिळाले आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने आवाहन केले आहे.
प्रतिवर्षी संघातर्फे अशा विद्यार्थ्यांना गुणवत्ता पारितोषिके दिली जातात. यावर्षीदेखील ज्या विद्यार्थ्यांना दहावीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त आणि बारावीमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत, पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षमध्ये जे विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत, तसेच पदवी व पदव्युत्तर परीक्षेत प्रथम श्रेणी प्राप्त झाली आहे अशा विद्यार्थ्यांनी संघाकडे विहित नमुन्यात अर्ज करावेत. त्याचप्रमाणे कर्हाडे ब्राह्मण ज्ञातीतील आठवीपासून पुढील हुशार व होतकरू विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते. यासाठी गरजू विद्यार्थ्यांनी कर्हाडे ब्राह्मण संघात उपलब्ध असणाऱ्या विहित नमुन्यात अर्ज भरून द्यावेत. यासाठी रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण संघ, शेरेनाका, झाडगाव, रत्नागिरी दूरध्वनी ०२३५२-२२४५७९ सचिव- ९४२१२२९२४६ – यांच्याशी संपर्क साधून ३१ जुलैपर्यंत अर्ज द्यावेत, असे आवाहन रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:11 27-05-2025














