राजापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्याने जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजण्याची शक्यता आहे. जुन्याच प्रभाग रचनेनुसार या निवडणुका होणार असल्याने तालुक्यात पूर्वीच्याच सहा जिल्हा परिषद गटांसह बारा पंचायत समितीच्या गणांमध्ये निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत.
पूर्वीच्या रचनेनुसार पाचल, ओणी, कोदवली, केळवली, सागवे आणि देवाचेगोठणे असे सहा जिल्हा परिषद गट होते. तर पाचल, ताम्हाणे, ओणी, ओझर, केळवली, कोंड्ये तर्फ सौंदळ, कोदवली, भालावली, सागवे, अणसुरे, देवाचे गोठणे, साखरीनाटे असा बारा पंचायत समिती गणांचा समावेश होता.
नवीन फेररचनेत राजापूर तालुक्यात सात जिल्हा परिषद गटासह चौदा पंचायत समित्यांचे गण अस्तित्त्वात आले होते. त्यामध्ये ताम्हाणे, तळवडे, केळवली, कशेळी, साखरेनाटे, कातळी, जुवाटी असे सात गट, तर ताम्हाणे, वाटूळ, तळवडे, पाचल, केळवली, कोदवली, कशेळी, पेंडखळे, साखरीनाटे, सोलगाव, कातळी, अणसुरे, जुवाटी, तारळ या गणांचा समावेश होता. नवीन जिल्हा परिषद गटात केवळ केळवली, तर पंचायत समिती गणात ताम्हाणे, पाचल, केळवली, अणसुरे, कोदवली, साखरीनाटे असे सहा गण पूर्वीच्याच नावाने ठेवण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाची पूर्वी जी स्थिती होती. तीच कायम ठेवून चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुका होण्याची चिन्हे आहेत. मात्र, या निवडणुका जुन्या प्रभाग रचनेनुसारच होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाची पूर्वी जी स्थिती होती. तीच कायम ठेवून चार महिन्यांत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशासकीय कारभार सुरू
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे मागील काही महिने जिल्हा परिषदेसह पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या आहेत. २० मार्च २०२२ रोजी रत्नागिरी जिल्हा परिषदेची, तर २२ मार्च २०२२ला पंचायत समित्यांची मुदत संपली आहे. तेव्हापासून दोन्ही ठिकाणी प्रशासकीय कारभार सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:23 PM 27/May/2025














