मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोनाने तोंड वर काढायला सुरूवात केली असून सक्रिय रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. सोमवारी (26 मे) देशात 1010 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
त्यामध्ये सर्वाधिक 430 रुग्ण हे केरळमध्ये सापडले. त्या खालोखाल महाराष्ट्रामध्ये 210 आणि दिल्लीमध्ये 104 रुग्णांची भर पडली. तर देशभरात एकूण 10 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाच्या चार नव्या व्हेरिएंटचा शोध लागला असून त्यापैकी JN.1 या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Covid 19 Cases In India : देशात कोरोनाचे नवे चार व्हेरिएंट
देशभरात कोरोनाचे चार नवे व्हेरिएंट सापडले आहेत. त्यामध्ये LF.7, XFG, JN.1 आणि NB.1.8.1 या व्हेरिएंटचा समावेश आहे. या नव्या व्हेरिएंट्सचा अभ्यास आयसीएमआरकडून केला जात आहे.
Maharashtra Corona Death : ठाण्यात एकाचा मृत्यू
सोमवारी ठाण्यातील कळव्यामध्ये एका 21 वर्षांच्या युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. या युवकावर 22 मे पासून उपचार सुरू होते. राज्यात आतापर्यंत चार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. तर देशात एकूण 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
Covid 19 JN.1 Variant : काय आहे JN.1 व्हेरिएंट?
JN.1 व्हेरिएंट हा ओमिक्रॉन BA.2.86 या व्हेरिएंटचा एक स्ट्रेन आहे. त्याला पिरोला असंही म्हटलं जातं. ऑगस्ट 2023 मध्ये हा व्हेरिएंट पहिल्यांदा समोर आला होता. डिसेंबर 2023 मध्ये WHO ने ते ‘इंटरेस्ट व्हेरिएंट’ म्हणून घोषित केले. या व्हेरिएंटमध्ये जवळपास 30 म्युटेशन कार्यरत असतात. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या मते, JN.1 इतर प्रकारांपेक्षा अधिक सहजपणे पसरतो, परंतु तो फार गंभीर नाही.
Symptoms Of JN.1 Variant : JN.1 व्हेरिएंटचे लक्षणे काय?
डोकेदुखी
ताप येणे
डोळ्यात जळजळ
कोरडा खोकला
चव जाणे आणि वास न येणे
घशामध्ये खवखव
सर्दी
थकवा येणे
मांसपेशींमध्ये वेदना
उलट्या होणे
JN.1 प्रकाराची लक्षणे काही दिवसांपासून ते आठवडे टिकू शकतात. जर तुमची लक्षणे बराच काळ टिकली तर तुम्हाला दीर्घकाळ कोविड असू शकतो. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये कोविड-19 ची काही लक्षणे बरी झाल्यानंतरही कायम राहतात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:59 27-05-2025














