संगमेश्वर : तुळसणी गावचे सुपुत्र संकेत लाड यांची राष्ट्रीय टेनिस क्रिकेटसाठी महाराष्ट्र संघात निवड

संगमेश्वर : पानिपत हरियाणा येथे ३ जून ते ६ जून २०२५ या कालावधीत होणाऱ्या ६ व्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट फेडरेशन कप २०२५ या स्पर्धेसाठी तालुक्यातील तुळसणी गावचे सुपुत्र संकेत रामचंद्र लाड यांची महाराष्ट्र राज्याच्या टेनिस क्रिकेट संघात निवड झाली आहे.

संकेत लाड यांनी कला शाखेतून बारावीपर्यतचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते शेती हा वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत. संकेत यांना लहानपणापासूनच खेळाची आवड आहे. संकेत यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण लोक विद्यालय तुळसणी या शाळेतून झाले. बारावीचे शिक्षण आश्रम शाळा निवे बुद्रुक या महाविद्यालयातून झाले आहे.

संकेत यांचे आई वडील हे शेती व्यवसाय करुन आपला उदरनिर्वाह चालवतात. संकेत लाड यांची महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:10 PM 27/May/2025