अखिल भारतीय बँक अधिकारी संघटना राज्य सचिवपदी प्रमोद शिंदे यांची निवड

रत्नागिरी : बँकिंग क्षेत्रातील महत्त्वाची संघटना असलेल्या अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेच्या राज्य सचिवपदी प्रमोद शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. अखिल भारतीय बँक अधिकारी संघटनेची बैठक नुकतीच पार पडली.

या बैठकीत अखिल भारतीय बँक अधिकारी संघटना एमएस-१ विभागाच्या राज्य सचिवपदी शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. शिंदे दीर्घकाळापासून बँक अधिकाऱ्यांच्या हक्कांसाठी लढा देणारे संघटनेतील सक्रिय नेतृत्व आहे. त्यांची विचारशीलता, संघटनकौशल्य अधिकारी वर्गातील आणि विश्वासामुळे त्यांना ही जबाबदारी मिळाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. बँकिंग क्षेत्रातील अनेक सहकारी व नेत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:02 AM 28/May/2025