रत्नागिरी : अकरावीतील ऑनलाईन प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील १७६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ७८३ विद्यार्थ्यांनी पैसे भरले असून, ऑनलाईन प्रवेशाची मुदत ३ जूनपर्यंत आहे. अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया सोमवारपासून (ता. २६) सुरू झाली. संकेतस्थळावर ही नोंदणी चालू झालेली आहे.
पहिल्याच दिवशी या प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला. प्रवेशाकरिता ३ जून रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत नोंदणीची मुदत ठेवण्यात आली आहे. राज्यात २ लाख ५९ हजार ६७३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली व ८४ हजार ३८ विद्यार्थ्यांनी पैसे भरले आहेत. दहावीच्या निकालात कोकण विभागीय मंडळाने राज्यात अव्वल स्थान प्राप्त केले. रत्नागिरी जिल्ह्यात १७ हजार ७५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेत पाऊस व मोबाईल रेंज नसल्यानेही अडथळे येत आहेत; परंतु लवकरच हे अडथळे दूर होऊन जास्तीत जास्त विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:08 AM 28/May/2025














