जयपूर : IPL 2025, Lucknow vs RCB: आयपीएलच्या 18 व्या हंगामातील शेवटचा साखळी सामना लखनौ सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात पार पडला. या सामन्यात लखनौनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 3 बाद 227 धावा केल्या.
रिषभ पंत आणि मिशेल मार्श या दोघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर लखनौनं 227 धावा केल्या. तर, जितेश शर्मा आणि विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर आरसीबीनं 18.4 ओव्हरमध्ये 4 बाद 230 धावा केल्या. यामुळं बंगळुरुनं विजयासह गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं. यामुळं प्लेऑफमधील दोन लढतीचं चित्र स्पष्ट झालं.
प्लेऑफच्या लढतीचं वेळापत्रक कसं असणार?
क्वालिफायर 1 : 29 मे रोजी ही मॅच चंदीगडच्या मुल्लानपूर येथील न्यू पीसीए ग्राऊंडवर होईल. क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात लढत होईल. या लढतीतील विजेता संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.
एलिमिनेटर : 30 मे रोजी एलिमिनेटरचा सामना मुंबई इंडियन्स आणि या गुजरात टायटन्स संघात होईल. एलिमिनेटरमध्ये विजयी झालेला संघ क्वालिपायर दोनमध्ये खेळेल. ही मॅच चंदीगडच्याचं मैदानावर होईल.
क्वालिफायर 2 : 1 जून रोजी हा क्वालिफायर 2 चा सामना एलिमिनेटर्समधील विजेता संघ आणि क्वालिफायर 1 मधील पराभूत संघ यांच्यात होईल. या लढतीतील विजेता संघ अंतिम फेरीत दाखल होईल. ही लढत गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल.
अंतिम फेरी : 3 जून रोजी आयपीएल फायनल देखील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 चा विजेते संघ यांच्यात ही लढत होईल.अंतिम फेरीत कोण कोणते संघ दाखल होणार हे 29 मे आणि 1 जूनला निश्चित होईल.
प्लेऑफमध्ये कोणकोणते संघ?
शुभमन गिलच्या नेतृत्त्वात गुजरात टायटन्स पहिल्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचली आहे. गुजरात टायटन्सकडे 18 गुण आहेत. शुभमन गिल दुसऱ्या हंगामात गुजरात टायटन्सचं नेतृत्त्व करतोय. प्लेऑफमधील प्रवेश निश्चित झाल्यानंतर गुजरातनं दोन सामने गमावले. प्लेऑफमध्ये त्यांना कामगिरी सुधारावी लागेल.
पंजाब किंग्ज :
पंजाब किंग्जनं तब्बल 11 वर्षानंतर प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. 19 गुणांसह ते गुणतालिकेत ते पहिल्या दोन मध्ये असणार हे निश्चित आहे. पंजाब किंग्जनं श्रेयस अय्यरला संघाचं नेतृत्त्व सोपवलं. श्रेयस अय्यरनं पंजाब किंग्जला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवून दिला. श्रेयस अय्यर तीन संघांचं नेतृत्त्व करताना त्यांना प्लेऑफमध्ये घेऊन जाणारा एकमेव कर्णधार ठरलाय. श्रेयस अय्यरनं दिल्ली आणि कोलकाताला देखील प्लेऑफमध्ये पोहोचवलं होतं.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : आयपीएलच्या 17 हंगामामध्ये एकदाही विजेतेपद न मिळालेली आरसीबी यंदा दमदार कामगिरी करतेय. आरसीबीचं नेतृत्त्व रजत पाटीदार करतोय. विराट कोहली या संघाचा प्रमुख आधार आहे.आरसीबी 19 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सनं गेल्या हंगामातील अपयश मागं टाकत प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. एलिमिनेटरमध्ये विजय मिळवून त्यांचा प्रयत्न क्वालिफायर 2 खेळण्याचा असेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 28-05-2025














