नवरात्रोत्सवाची आज सांगता

रत्नागिरी : जिल्ह्यात सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूम सुरू होती. नऊ दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरण मंगलमय झाले होते. आज (ता. १२) नवरात्रोत्सव उत्सवाची सांगता होणार आहे. शहरातील मांडवी किनाऱ्यासह जिल्ह्यातील ४८७ श्री दुर्गादेवीच्या मूर्तीना निरोप देण्यात येणार आहे.

घटस्थापनेपासून नवरात्रोत्सवाला सुरवात झाली होती. ठिकठिकाणी गरबा, दांडिया आदींचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात ९० ठिकाणी दुर्गामातेच्या फोटोचे पूजन करण्यात आले होते. जिल्ह्यात ३६ हजार ६२९ ठिकाणी खासगी तर १७४ ठिकाणच्या नऊ दिवसानंतर दांडिया आणि गरब्याची ‘धूम’ थंडावणार आहे. शनिवारी या श्री दुर्गामातेच्या मूर्तीना नवरात्रोत्सव मंडळांकडून निरोप देण्यात येणार आहे. सायंकाळी चार वाजल्यापासून शहरात दुर्गामातेच्या मूर्ती विसर्जनाला सुरवात होणार आहे; पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 12-10-2024