गुहागर : एका वृद्धाने जिल्ह्यातील महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. महिलेने याबाबत पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून, वृद्धाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
अनेक दिवसांपासून त्याचे असे प्रकार सुरू होते. यावर कुटुंबात बैठक होऊन माफीनामाही झाला; मात्र आपल्या सवयीतून न सुटलेल्या या वृद्धाने वर्तणूक कायम ठेवली. त्रस्त झालेल्या महिलेने अखेरीस पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी वृद्धावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 28/May/2025














