रत्नागिरी : नांदिवडे (अंबुवाडी) येथे होणारे गॅस टर्मिनलचे काम त्वरित बंद करण्याचे आदेश शासनाच्या सागरी मंडळाने दिले आहेत. त्यामुळे आज (ता. २८) होणारे नांदिवडे ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू यांनी यामध्ये भूमिका घेतल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
नांदिवडेच्या माथ्यावर जिंदल कंपनी गॅस टर्मिनल प्रकल्प उभारत आहे. आधीच जिंदल कंपनीच्या कोळशाची धूळ आणि राख यांनी सर्व शेतकरी व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लोकवस्तीमध्ये जिंदल गॅस टर्मिनल उभारत असताना जनसुनावणी घेतली नाही. एक किलोमीटरच्या परिसरामध्ये सहा शाळा आहेत. याचा देखील प्रशासनाने विचार केला नाही. २८ मे २०२५ ला जिंदल गॅस टर्मिनल स्थलांतर करण्यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी ११ वाजल्यापासून आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. या आंदोलनाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने जाहीर पाठिंबा दिला होता.
दरम्यान, शासनाच्या सागरी मंडळाने नांदिवडे (अंबुवाडी) येथे होणारे गॅस टर्मिनलचे काम त्वरित बंद करा, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे बुधवारी (ता. २८) होणारे नांदिवडे ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे, तसे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:45 AM 28/May/2025














