Rohini Khadase: जपानला मागे टाकत भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; जपान मध्ये कोणती महिला रस्त्यावर बाळाला जन्म देत असेल?, रोहिणी खडसेंची सरकारवर आगपाखड

मुक्ताईनगर : जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या बोरमळी गावातील आदिवासी पाड्यातील एका महिलेने आरोग्य यंत्रणा नसल्याने भररस्त्यात एका बाळाला जन्म दिला आहे. यावरून सर्व स्तरातून टीका होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी देखील यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे म्हणाल्या की, जपानला मागे टाकत आपला देश जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे अशा बातम्या कालपरवा पासून आपण मीडियामध्ये ऐकत आहोत. मला वाटत नाही की जपानमध्ये कधी आरोग्य यंत्रणेअभावी एखाद्या महिलेने रस्त्यावर बाळाला जन्म दिला आहे. पण आपल्या भारतात ते घडले आहे तेही आपल्या महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्याच्या बोरमळी गावात एक महिलेने आरोग्य यंत्रणाच नसल्याने भररस्त्यात एका बाळाला जन्म दिला आहे असे त्यांनी सांगितले आहे.

पुढे रोहिणी खडसे म्हणाल्या की, आमच्या जळगाव जिल्ह्यात चार चार मंत्री आहेत. पण आरोग्य यंत्रणा तितकी सक्षम नाही. त्यामुळे ही जी घटना घडली आहे त्यासाठी प्रत्येकाला लाज वाटली पाहिजे, प्रत्येकांसाठी ही लाजीरवाणी बाब आहे. पुरेशी आरोग्य यंत्रणा नसल्याने एका लाडक्या बहिणीने रस्त्यावर बाळाला जन्म दिला आहे ही शोकांतिका देखील त्यांनी बोलून दाखवली आहे.

रोहिणी खडसेंनी केली सोशल मिडियावर पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसेंनी या प्रकरणी पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये रोहिणी खडसे लिहतात, एकीकडे आपण जपानला मागे टाकत भारत हा जगातल्या चौथा अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचल्याच्या टीमक्या मिरवत आहोत आणि दुसरीकडे आपलीच एक लाडकी बहीण रस्त्यावर प्रसूत होत आहे.अजून किती दिवस माझ्या लाड़क्या बहिनीची प्रगतिशील भारताच्या खोट्या जाहिरातीच्या मागे अशी हेडसांड होत राहिल. घटना ही जळगाव जिल्ह्यातील चोपड़ा तालुक्यातील बोरमळी येथील आहे”.

पुणे त्यांनी म्हटलं की, कालपासून मी वृत्तपत्रांमध्ये वाचते आहे की, जपानला मागे टाकत भारत हा जगातल्या चौथा अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचला आहे. पण मला वाटत नाही की जपानमध्ये भर रस्त्यामध्ये कोणती महिला बाळाला जन्म घालत असेल. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये हे घडतं आहे. राज्यातील जळगाव जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपड़ा तालुक्यातील बोरमळी येथे एका महिलेने भर रस्त्यात महिलेने जन्म दिला. प्रसुतीकळांना सुरूवात झाल्यानंतर आरोग्य व्यवस्था न मिळाल्याने दवाखान्यापर्यंत जाताना भर रस्त्यात त्या महिलेने त्या बाळाला जन्म दिला. ही घटना घडली त्या जळगाव जिल्ह्यामध्ये चार चार मंत्री आहेत. प्रत्येकाला लाज वाटावी आणि ही लाजीरवाणी बाब म्हणावी लागेल, असंही पुढे रोहिणी खडसेंनी म्हटलं आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 28-05-2025