रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीपूर्वी अनेकांचे सीमोल्लंघन?

रत्नागिरी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच वॉच’वर आहेत. मात्र राजकीय पक्ष ‘वेट अॅण्ड , दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर आणि दक्षिण रत्नागिरीमध्ये अनेकजण सीमोल्लंघनाच्या तयारीत आहेत, अशी राजकीय गोटात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. जोपर्यंत विधानसभेची आचारसंहिता जाहीर होत नाही तोपर्यंत राजकीय गोटात शांतता असली तरी शिवसेना, भाजप व अन्य पक्षात पक्षांतराचे वारे मात्र वाहू लागले आहेत.

रत्नागिरी येथे भाजपचे माजी आमदार बाळ माने यांनी भाजपच्या सभेत आपला निर्धार पक्का केल्याचे सांगितले. यानंतर या सीमोल्लंघनाला अधिक बळ मिळाले आहे. त्यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

भाजपच्या कार्यकत्यांना मार्गदर्शन करताना सामंत यांचे नाव न घेता त्यांनी आपला निर्णय झाल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बाळ माने यांचे सीमोल्लंघन कधी होणार? असा प्रश्न आहे. ते दसऱ्याच्या मुहूर्तावर सीमोल्लंघन करणार की रत्नागिरीच्या सभेत त्यांचा पक्षप्रवेश होणार या बाबत उत्सुकता आहे. त्यामुळे दक्षिण आहे. रत्नागिरीतील या सीमोल्लंघनाची जोरदार चर्चा
सुरू झाली आहे. त्यांच्या बरोबर रत्नागिरीसह जिल्हाभरात अन्य कोण-कोण सीमोल्लंघन करणार या बाबत कार्यकर्त्यांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे. माने यांना मानणारा जिल्ह्यात मोठा वर्गदेखील आहे. त्यामुळे त्याचे परिणाम भाजपवर कसे होतात, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

याचबरोबर उत्तर रत्नागिरीत देखील काहींनी सीमोल्लंघनाची तयारी केली आहे. भाजपा आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये जिल्हाभर सीमोल्लंघन होणार असल्याची चर्चा सुरू आहे. येथील काहीजण शिंदेंची शिवसेना तर काही ठाकरेंच्या शिवसेनेच्या गळाला लागले आहे असे बोलले जात आहे. मात्र, सद्यस्थिती सर्वकाही वेट अॅण्ड वॉच’वर आहे. आचारसंहिता जाहीर होत असल्याचे अद्याप राजकीय रंग भरले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्यास अंतीम तारीख जवळ येत नाही, शिवाय अर्ज मागे घेण्याची मुदत टळत नाही तोपर्यंत हा राजकीय सस्पेन्स कायम राहाणार आहे.

सद्यस्थितीत भाजपा आणि ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये अनेक नेते, पदाधिक सीमोल्लंघनाच्या तयारीत आहेत, अशी चचर्चा राजकीय गोटात रंगली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 12-10-2024