राजापूर- रत्नागिरी एसटी बस बंद

गावखडी : राजापूर मधून स. 11 वा. सुटणारी राजापूर रत्नागिरी गाडी व्हाया कशेळी सावरेवाडी आगवेकरवाडी मार्गावरून रत्नागिरी एसटी बस एक महिना बंद आहे.

तसेच सावरेवाडी, आवळीचीवाडी, तेलीवाडी, बौद्धवाडी, सुतारवाडी, या वाड्यातून तर प्रवासी वर्गाचे हाल होत आहेत राजापूर रत्नागिरी कशेळी व्हाया एसटी बस लवकर चालु करावी अशी मागणी प्रवाशी वर्ग करत आहे.

ही एसटी बस संबंधित अधिकारीही योग्य ती दखल घ्यावी तसेच राजापूर रत्नागिरी एसटी बस लवकर सुरू करावी अशी मागणी कशेळी माजी ग्राम सदस्य श्री दिलीप फोडकर यानी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 PM 28/May/2025