दापोली : मासेमारी व्यवसाय अडचणीत

दापोली : तालुक्यात गेल्या ५ ते ६ दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने समुद्रात गेलेल्या अनेक नौका किनाऱ्याकडे परतल्या आहेत. हर्णै बंदरात नव्याने बांधण्यात आलेल्या संरक्षक बंधाऱ्याच्या आडोशाला अनेकांनी नौका उभ्या केल्या आहेत.

या पावसामुळे मासेमारी व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे मच्छीमारांचे अतोनात नुकसान होत आहे. ३१ मे हा मासेमारीचा शेवटचा दिवस असतो. १ जूनपासून दोन महिन्यांसाठी मासेमारी बंद होते. त्याआधीचा हे आठ ते दहा दिवस अधिक व्यवसाय होतो. मात्र याच दिवसात मासेमारी बंद असल्याने मच्छिमारांना खूप मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:55 PM 28/May/2025