Agriculture News : राज्यात अनेक भागात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. दरम्यान, राज्यात मान्सूनपूर्व पावसानं देखील जोरदार हजेरी लावली होती.
त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. जमिनीत पुरेशी ओल देखील गेली आहे. त्यामुळं वापसा आल्यावर
शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागानं शेतकऱ्यांना दिला आहे.
जोपर्यंत वापसा येत नाही तोपर्यंत पेरणी करता येणार नाही
राज्यातील अनेक भागात मान्सूनपूर्व पाऊस झाल्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. जिथे जास्त पाऊस झाला आहे, त्याठिकाणच्या शेतकऱ्यांना थांबावं लागेल. जोपर्यंत वापसा येत नाही तोपर्यंत पेरणी करता येणार नाही अशी माहिती कृषी विभागानं दिली आहे. जिथे जास्त पाऊस झाला आहे तिथं वापसा आल्यावर पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिला आहे.
उन्हाळी हंगामात पिकं, फळ पिकं काढणीला आली आहेत. मान्सूनपूर्व पावसामुळं राज्यातील 34 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. त्याठिकाणी पंचनाम्याच्या सूचना दिल्या आहेत. पंचनामा पूर्ण झाला की त्याचा संबंधित अहवाल राज्य शासनाला देण्यात येईल, अशी माहिती पुणे विभागाचे कृषी संचालक र. शा. नाईकवाडी यांनी दिली आहे. मॉन्सून लवकर दाखल झाला आहे. 11 दिवस आधीच मॉन्सून दाखल झाला आहे. राज्यात 140 मिलिमीटर मान्सूनपूर्व पाऊस झाला आहे. त्यामुळं वापसा होईपर्यंत शेतकऱ्यांनी थांबावं असा सल्ला कृषी विभागानं दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:51 28-05-2025














