नागपूर : राज्यातील महिलांवर होणारा अत्याचार व त्याकडे होणारे दुर्लक्ष बघता राज्य महिला आयोग बरखास्त करण्याची गरज नाही. मात्र, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना बदलावण्याची वेळ आली आहे.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अराजकीय महिलेची नेमणूक करावी अशी मागणी रोहिणी खडसे व सुषमा अंधारे यांनी केली आहे.
राज्यातील महिलांच्या तक्रारी जाणून घेण्यासाठी फक्त एक महिला आहे. ना राज्य महिला आयोगाच्या सदस्याची नेमणूक झाली, ना जिल्हा महिला आयोगावर नेमणुका असेच राहिले तर मग राज्यातील महिलांना न्याय कसा मिळणार ? फक्त सर्व अधिकार आपल्याकडेच राहावे यासाठी इतर सदस्यांच्या नेमणूक थांबल्या असाव्यात असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला. फक्त मेलवर महिला आयोग काम करत आहे. मग जे काम क्लर्क करू शकते मग आयोगाला अध्यक्षांची गरज काय? असे रोहिणी खडसे म्हणाल्या. राज्यात सध्या राज्य महिला आयोग तक्रारदारांचा पक्ष बघून कारवाई करत आहे. यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आयोगावर अराजकीय महिलेची नेमणूक अशी मागणी करणार असल्याचे सुषमा अंधारे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडून रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्षपद सांभाळताना महिला आयोगाच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आहे. तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण हे राष्ट्रवादीशी संबंधित आहे, त्यामुळं रुपाली चाकणकर जाणीवपूर्वक प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही रोहिणी खडसे यांनी केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून रोहिणी खडसे यांनी रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आता यावर रुपाली चाकणकर काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:45 28-05-2025














