१०० दिवस मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातील पाच शासकीय कार्यालयांनी पटकावले राज्यात अव्वल स्थान

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेचा निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच जाहीर केला. या मोहिमेत रत्नागिरी जिल्ह्यातील पाच शासकीय कार्यालयांनी राज्यात अव्वल स्थान पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

यामध्ये तीन कार्यालये प्रथम तर दोन कार्यालये द्वितीय क्रमांकावर आली आहेत. राज्य शासनाच्या या महत्वाकांक्षी मोहिमेंतर्गत विभागीय आणि जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालयांच्या दुसऱ्या टप्प्यातील मूल्यांकन करण्यात आले होते. यात जिल्हास्तरावरील कार्यालयांमध्ये रत्नागिरीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा सांख्यिकी कार्यालय आणि जलसंपदा विभाग ही तीन कार्यालये राज्यात प्रथम आली आहेत. तर, सहायक आयुक्त, समाज कल्याण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) ही कार्यालये द्वितीय क्रमांकावर आली आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:42 PM 28/May/2025