रत्नागिरी : सरकारी जागेवर अतिक्रमणप्रकरणी गुन्हा

रत्नागिरी : शहरातील शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर, खारेघाट रोड येथील सरकारी मिळकतीच्या जागेत अज्ञात व्यक्तीने बेकायदेशीर अतिक्रमण केले. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना १९७३ पूर्वी ते १० ऑक्टोबर २०२४ या कालावधीच्या मुदतीत घडली आहे. याकाळात शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर, खारेघाट रोड रत्नागिरी येथील नगर भूमापन क्र. ३५४२ या मिळकतीच्या सरकारी जागेत अज्ञाताने अतिक्रमण करून बांधकाम केले आहे. या प्रकरणी झाकीर सय्यद यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित अज्ञाताविरूद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२९ (३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:48 12-10-2024