गुहागर : कोळवली हायस्कूलच्या सहेली वाघेचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश

गुहागर : क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय विभाग रत्नागिरी यांच्यावतीने तालुकास्तरीय पावसाळी वैयक्तिक क्रीडा स्पर्धा देवघर हायस्कूलच्या मैदानावर झाल्या. स्पर्धेत कोळवली हायस्कूलची सहेली वाघे हिने लांब उडी प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील या यशाबद्दल ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शांताराम वाघे, रामचंद्र मोरे, नारायण मोहिते, सहसचिव शंकर जोशी, सदस्य आदींनी अभिनंदन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 12/Oct/2024