रत्नागिरी : रेल्वे प्रवासादरम्यान सिंधुदुर्ग येथील वृध्द सीएसटी ते कणकवली असा जात असताना रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथून बेपत्ता झाला. ही घटना सोमवार २६ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ४ वा. सुमारास घडली.
प्रकाश आत्माराम रोगये (६२, मूळ रा. फणसगाव कोकाटेवाडी देवगड, सिंधुदुर्ग, सध्या रा. नवी मुंबई) असे बेपत्ता झालेल्या वृध्दाचे नाव आहे. ते २५ एप्रिल २०२५ रोजी मंगळुरु एक्स्प्रेसने सीएसएमटी ते कणकवली असा प्रवास करत होते. २६ एप्रिल रोजी पहाटे ४ वा. सुमारास त्यांची रेल्वे गाडी रत्नागिरी रेल्वेस्टेशनवर आली असता ते तेथून बेपत्ता झाले. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा सर्वत्र शोध घेउनही ते आढळून न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शहर पोलिस ठाण्यात खबर दिली. केस पांढरे, डोळयांना गोल आकाराचा चष्मा, नेसणीस गुलाबी रंगाचा हाफ बाह्यांचा शर्ट, करड्या रंगाची फूल पॅन्ट, पायात स्लिपर असे बेपत्ता झालेल्या वृद्ध रेल्वे प्रवाशाचे वर्णन आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:38 28-05-2025














