आंबा घाटात दरडी कोसळण्याचा धोका

साखरपा : मिऱ्या नागपूर महामार्गावर काही ठिकाणी डोंगरकटाईमुळे दरडी कोसळण्याचा धोका असून, पादचारी व वाहनधारकांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये याची खबरदारी घेण्याचे आदेश विभागीय अधिकारी विश्वजित गाताडे व संगमेश्वरच्या तहसीलदार अमृता साबळे यांनी महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना दिल्या आहेत. तसेच नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी, असे आवाहन केले.

पावसाने गेले आठ दिवस धुमाकूळ घातला असून, सर्वच यंत्रणांना सतर्क राहण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

या धर्तीवर संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथील धरणाची आणि चोरवणे ते आंबाघाटापर्यंत महामार्गाची, आजुबाजूच्या घरांची प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली. या वेळी संयुक्त नैसर्गिक आपत्ती पाहणी उपविभागीय अधिकारी विश्वजीत गाताडे, तहसीलदार अमृता साबळे, नायब तहसीलदार सुदेश गोताड, मंडळ अधिकारी नारायण चौधर, ग्राममहसूल अधिकारी अमोल लोकरे, आत्माराम मुरकुटे, राम खडके, अविनाश चौगुले, जिल्हा नियोजन समिती सदस्य बापू शेट्ये, साखरपा ग्रामपंचायत सदस्य व कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य ओंकार कोलते, पोलिस यंत्राणा संजय गांधी, प्रवीण जोयशी, राजेश कामेरकर, बापू शिंदे, किरण दाभोळकर, पिंट्या देवळेकर आदींचा समावेश होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 29/May/2025