नवी दिल्ली : पाकिस्तानला लागून असणाऱ्या सीमावर्ती भागातील जम्मू-काश्मीर, गुजरात, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये आज (ता.२९) सायंकाळी पुन्हा रंगीत तालिम (मॉक ड्रील) आयोजित करण्यात आली आहे. या मॉक ड्रीलच्या पार्श्वभूमीवर लोकांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तत्पूर्वी सात मे रोजी देशातील २४४ जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले होते. या काळामध्ये बारा मिनिटांसाठी ब्लॅकआउट करण्यात आले होते. युद्ध काळामध्ये स्वतःचा बचाव कसा करायचा, याचे प्रशिक्षण नागरिकांना देण्यात आले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध पेटले असताना देशामध्ये १९७१ मध्ये प्रथम मॉक ड्रीलचे आयोजन केले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 29-05-2025














