विलास रहाटे यांची रांगोळीतून स्वा. सावरकरांना मानवंदना

साखरपा : स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्रासाठी कायम प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व राहिले आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त देवरूख येथील रांगोळीकार विलास रहाटे यांनी त्यांची पोर्ट्रेट रांगोळी साकारत त्यांना मानवंदना दिली.

विनायक दामोदर सावरकर हे महाराष्ट्राप्रमाणेच देशातील एक अग्रगण्य क्रांतिकारक नाव. देशातील तरुणांना आजही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आकर्षण वाटते. त्यांच्या कार्याला मानवंदना देण्याच्या हेतूने रांगोळीकार विलास रहाटे यांनी त्यांची पोर्ट्रेट रांगोळी साकारली.

रहाटे हे सध्या मुंबई विद्यापीठाशी संलग्न असून, ते विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या संघाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे त्यांनी या रांगोळीत एका बाजूला मुंबई विद्यापीठाचा ऐतिहासिक घड्याळाचा मनोरा आणि त्याच्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा अशी ही रांगोळी साकारली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 29/May/2025