संगमेश्वर : आंबव-पोंक्षे रस्त्यावर खडीची मलमपट्टी

संगमेश्वर : केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग ३ मधून रस्त्याचे काम झाले; परंतु आरवलीजवळ रस्ता खचला असून, मैलाचा दगडदेखील वाहून गेला आहे. तेथे फक्त खडी टाकून मलमपट्टी करण्यात आली आहे. या मलमपट्टीने खचलेला रस्ता पुढील पावसात कसा टिकेल, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे. त्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आंबव पोंक्षे ते आरवली रस्त्यासाठी सात कोटींचा निधी मंजूर होता. हा रस्ता बनवताना चुकीच्या पद्धतीने गटारे बांधण्यात आली आहेत. त्यामुळे पहिल्याच पावसात बाजूपट्टी वाहून गेली आहे. गाडी रस्त्याच्या कडेला नेणेही धोकादायक बनलेले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 29/May/2025