साखरपा : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे साखरपा गावाच्या परिसरातील महामार्ग चिखलात गेला आहे. या महामार्गावरून वाहने चालवणे जिकिरीचे झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह साखरपा पंचक्रोशीत जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. यामुळे साखरपा गाव परिसरात चिखल पसरलेला पाहावयास मिळत आहे.
साखरपा गावाबाहेरून जात असलेल्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. देवरुखला जाणाऱ्या मार्गाजवळ अद्याप काम सुरू आहे. त्याचप्रमाणे कोंडगाव येथील इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या पुढे महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. संकेत हॉटेल पासून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गाचे कामही अपूर्णच आहे. त्यामुळे त्याठिकाणीही चिखल झाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 29/May/2025














