लांजा : रखडलेले श्रीरामपूल ब्रिजचे काम ठेकेदाराने युद्धपातळीवर सुरू केले होते. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी मंगळवार (ता. २७) सायंकाळी सहा वाजता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गावर श्रीराम मंदिरासमोरील वहाळावरील श्रीराम पुलाचे काम मे महिन्यात हाती घेण्यात आले होते; मात्र काही दिवस हे काम संथगतीने सुरू असल्यामुळे पर्यायीमार्गे वाहतूक सुरू केली. हा मार्ग अडचणीचा ठरत होता. त्याप्रमाणे तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी आणि येथील पाणी येथील नागरिकांच्या घरात घुसत होते. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
लांजावासीयांतून ठेकेदार कंपनीच्या कामाबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला होता. लोकांची गैरसोय लक्षात घेऊन सोमवारी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी लांजा शहराला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली, तसेच आमदार किरण सामंत यांनीही महामार्गाचा ठेकेदार आणि बांधकाम विभाग यांना तातडीच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अखेर महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदाराने गैरसोय लक्षात घेऊन युद्धपातळीवर काम हाती घेतले. या महामार्गावर नव्याने बांधलेला श्रीराम पूल वाहतुकीसाठी खुला केला. मंगळवारी सायंकाळी सहा वाजता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला. त्यानंतर नव्या पुलावरून वाहतूक सुरू झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 29/May/2025














