रत्नागिरी पोलिसांची धडक कारवाई : खेडमधील रेकॉर्डवरील चोरटा जेरबंद!

रत्नागिरी, [२९ मे, २०२५]: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी कंबर कसली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) धडक कारवाई करत खेड शहरातील एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस अंमलदार बुधवार, २८ मे रोजी खेडमधील नवानगर लवेल परिसरात गस्त घालत होते. यावेळी त्यांना सचिन रामसहजीवन चव्हाण (वय २१, रा. आजगणी नवानगर लवेल, ता. खेड) हा संशयीत अवस्थेत आढळून आला.

पोलिसांनी सचिन चव्हाण याची अधिक चौकशी केली असता, तो खेड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दोन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये (गुन्हा रजिस्टर नंबर १११/२०२५ आणि ११८/२०२५, भा.न्या.सं. कलम ३३१ (४), ३०५, ३ (५)) पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले.

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी खेड पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास खेड पोलीस ठाणे करत आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखालील टीमने केली. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक श्री. वाघ, पो.हवा. बाळू पालकर, गणेश सावंत, सत्यजित दरेकर, विक्रम पाटील, रमिज शेख आणि चा.पो.शी. अनिकेत नलावडे यांचा समावेश होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 29-05-2025