चिपळूण : वादळी वाऱ्याच्या पावसात वीज वाहिनी तुटली

चिपळूण : जिल्ह्याच्या काही भागांत झालेल्या पहिल्याच पावसात, वादळी वाऱ्यामुळे चिपळूण तालुक्यातील उमेदवाडी येथील रस्त्यावर विनायक सावंत यांच्या घरासमोर विजेची वाहिनी तुटल्याची घटना घडली. या घटनेने भीती व्यक्त होत आहे. ही वीज वाहिनी तुटून रस्त्यावरच पडलेली असल्याने शॉक लागून मोठी दुर्घटना घडू शकते. महावितरणने वेळीच याकडे लक्ष देऊन ही वीज वाहिनी उचलावी अशी मागणी होत आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र परिसरातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सावर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र परिसर इकडे वीज पुरवठा रात्रभर खंडीत आहे.

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आलेल्या पावसामुळे आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उडेगवाडी रस्त्यावरील एक वीज वाहिनी तुटून खाली पडली. ही घटना विनायक सावंत यांच्या घरासमोर घडल्याने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी तात्काळ सावध भूमिका घेतल्याने आणि वीज वितरण कंपनीला माहिती दिल्याने पुढील अनर्थ टळला. वीज पुरवठा खंडित झाल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. नागरिकांनी तुटलेल्या तारांपासून दूर राहावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 29/May/2025