रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य प्रा. डॉ. गोविंद काळे, प्रा. डॉ. नीलिमा सरप (लखाडे) व ज्योतिराम चव्हाण जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
सोमवार दि. 2 जून रोजी सायंकाळी 6 वाजता रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात त्यांचे आगमन व मुक्काम होईल.
मंगळवार दि. 3 जून रोजी सकाळी 10 ते 11 वाजता जिल्हाधिकारी रत्नागिरी, अध्यक्ष जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती व जिल्ह्यातील प्रांताधिकारी यांच्या समवेत वैश्यवाणी, शैव गुरव, भाविक गुरव, घाडी गुरव जात समूहाबाबत बैठक. (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह). सकाळी 10 ते दुपारी 12 वाजता जिल्ह्यातील वैश्यवाणी, शैव गुरव, भाविक गुरव, घाडी गुरव या जातसमूहांच्या प्रतिनिधींशी चर्चा व सुनावणी (स्थळ : जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह). दुपारी 12.30 वाजता भोजन. दुपारी 1 ते सायंकाळी 6 वाजता वैश्यवाणी, शैव गुरव, भाविक गुरव, घाडी गुरव जात समूहाची जिल्ह्यामध्ये क्षेत्रपाहणी. सायंकाळी 6 वाजता सिंधुदुर्गकडे रवाना.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:28 29-05-2025














