देवरूख : कर्करोग निदान व्हॅनद्वारे ११२ महिलांची तपासणी

देवरूख : महिला कर्करोग तपासणी अभियान अंतर्गत देवरूख ग्रामीण रुग्णालयात सोमवारी अत्याधुनिक कर्करोग निदान व्हॅनद्वारे ११२ महिलांची मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली. या उपक्रमाबद्दल महिलावर्गाने समाधान व्यक्त केले.

समाजामध्ये महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी कर्करोग जनजागृती व तपासणी शिबिर देवरूख ग्रामीण रुग्णालय येथे घेण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:40 PM 29/May/2025