राजापूर : विद्युत वाहिनीला ओल्या बांबूचा स्पर्श झाल्याने रंगकाम करणारा कामगार गंभीर जखमी

लांजा : विद्युत वाहिनीला ओल्या बांबूचा स्पर्श झाल्याने घराचे रंगकाम करणारा कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान लांजातील गोंडेसखल रोड येथे घडली आहे.

राजापूर तालुक्यातील वडदहसोळ येथील तुकाराम केशव मिरजोळकर हे शहरातील गोंडेसकल रोड येथील घराचे रंगकाम करत होते. त्या घराच्या बाजूने विद्युतभारीत वाहिनी गेली होती. मिरजोळकर ज्या शिडीवर उभे होते, त्या शिडीचा ओला बांबू विद्युत वाहिनीला लागला आणि त्यांना जोरदार झटका बसला. त्यामुळे ते कंपाऊंडच्या लोखंडी रेलिंगवर पडले. ग्रीलवर आपटल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. तातडीने त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लांजाचे पोलिस निरीक्षक नीळकंठ बगळे यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाला भेट दिली. मात्र त्यावेळी घरामध्ये कोणीच उपस्थित नसल्याने अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 29/May/2025