Gold Silver Rate : भारतात सोन्याला नेहमीच महत्त्वाचे स्थान आहे. सणासुदीला असो किंवा गुंतवणुकीसाठी, सोन्याकडे एक महत्त्वाचा पर्याय म्हणून पाहिलं जातं. पण, आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक थोडी कमी झाली आहे.
अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे शुल्क रद्द केल्यामुळे आणि जागतिक बाजारात अनिश्चितता कमी झाल्यामुळे, सोन्याचे दर घसरले आहेत. अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळेही सोन्याच्या किमतींवर परिणाम झाला आहे.
आज सोन्याच्या दरात मोठी घसरण!
- २४ कॅरेट सोन्याचा दर: आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत ९७,०४० रुपये आहे. काल ती ९७,४८० रुपये होती, म्हणजेच आज ४४० रुपयांची घसरण झाली आहे.
- २२ कॅरेट सोन्याचा दर: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ८८,९५० रुपये आहे. काल ती ८९,३५० रुपये होती, म्हणजेच आज ४०० रुपयांची घसरण दिसून आली आहे.
- १८ कॅरेट सोन्याचा दर: १० ग्रॅम १८ कॅरेट सोन्याची किंमत ७२,७८० रुपये आहे. काल ती ७३,११० रुपये होती, म्हणजेच आज ३३० रुपयांची घसरण झाली आहे.
प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर (२२ कॅरेट, प्रति १० ग्रॅम)
सोन्याची किंमत दररोज डॉलरच्या किमतीतील चढ-उतार, कच्च्या तेलाच्या किमती आणि विनिमय दर यांसारख्या अनेक घटकांवर अवलंबून असते.
- दिल्ली: ८९,६४० रुपये
- मुंबई* ८९,४९० रुपये
- कोलकाता: ८९,४९० रुपये
- गुरुग्राम: ८९,६४० रुपये
- तर आज देशांतर्गत बाजारात १ किलो चांदीची किंमत ९९,९०० रुपये आहे.
घसरणीमागे काय कारण?
सोन्याच्या किमती घसरण्यामागचं मुख्य कारण म्हणजे अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले शुल्क रद्द केलं आहे. या निर्णयामुळे सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्यावर दबाव वाढला आहे. याशिवाय, अमेरिकन डॉलरच्या मजबुतीमुळेही सोन्याचे दर कमी झाले आहेत.
सोन्याच्या शुद्धतेची खात्री कशी कराल?
सोनं खरेदी करताना, नेहमी भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे प्रमाणित हॉलमार्क केलेले सोनं खरेदी करा. सोन्यावर ६ अंकी हॉलमार्क कोड असतो, ज्याला हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUID) असेही म्हणतात. हा क्रमांक अल्फा-न्यूमेरिक (उदा. AZ4524) असतो, ज्यामुळे तुम्ही सोन्याच्या शुद्धतेची आणि विश्वासार्हतेची खात्री करू शकता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:57 29-05-2025














