कोकण विभागातील वजन माप उत्पादक विक्रेत्यांची ३ जून रोजी कार्यशाळा

रत्नागिरी : कोकण विभागातील वजन माप उत्पादक दुरुस्तक व विक्रेते यांचे स्नेहसंमेलन व कार्यशाळा संघटनेच्या वतीने मंगळवार दि. ३ जून रोजी पनवेल येथील संस्मरण बैंकट हॉल, निल एन्क्लेव्ह, खांदा कॉलनी येथे सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे.

यावेळी कोकण विभागातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील वजन माप परवानाधारक तसेच महाराष्ट्रातील संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे कार्यशालेत महाराष्ट्र शासनाचा वैधमापन शास्त्र विभाग सहभागी होणार आहे.

महाराष्ट्र वैध मापनशास्त्र, कोकण विभागाचे सहनियंत्रक शिवाजी काकडे मार्गदर्शन करणार आहेत. शासनाच्या व वैधमापन शास्त्र विभागाचे धोरण, व्यवसाय सुलभता, ऑनलाइन कार्यप्रणाली, वैध मापन शास्त्र अधिनियम इ.चे मार्गदर्शन होणार आहे. शासन यंत्रणा वजन माप व्यवसायिक यांच्यात समन्वय साधून व्यवसाय सुलभ वातावरण कोकणात तयार करणे, हा उद्देश आहे. या कार्यक्रमाचा लाभ कोकणातील वजन माप परवानाधारकांनी घ्यावा असे आव्हान संघटनेने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:03 PM 29/May/2025