रत्नागिरी : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या राजापूर येथील शिबिराच्या ठिकाणात बदल करण्यात आला आहे.
राजापूर येथे शिकाऊ अनुज्ञप्ती, पक्की अनुज्ञप्ती, वाहनाची पुनर्नोंदणी व नवीन वाहनांची नोंदणी इत्यादीचे कामकाज आता शुक्रवार, दि. ३० मे रोजी राजापूर शिक्षक प्रसारक मंडळाच्या राजापूर हायस्कूल मैदानावर होणार आहे.
यापूर्वी हे शिबिर शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आले होते. परंतु शासकीय विश्रामगृहाच्या दुरुस्तीचे कामकाज सुरू असल्याने ठिकाण बदलण्यात आले आहे. नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:10 29-05-2025














