दापोलीच्या हायटेक एसटी आगारात चिखलाचे साम्राज्य

⏩ दापोली : आधीच दापोली आगारातील मोडकळीस आलेल्या एसटी बसने त्रस्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्याना आगारातील चिखलातून वाट काढावी लागत आहे. दापोली आगाराच्या सुशोभिकरणासाठी आलेले लाखो रुपये गेले कुठे? असा सवाल या वेळी उपस्थित होत आहे. नुकतेच वर्षभरापूर्वी दापोली आगारातील एसटी बस फलाटाचे काँक्रिटीकरण करण्यात आले. या साठी लाखोंचा निधी आला होता त्यामुळे दापोली बस स्थानकाचे रुपडे पालटेल असे वाटत होते. मात्र ज्या ठिकाणी गाड्यांची दुरुस्ती होते, डिझेल भरले जाते या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात चिखलमाती आहे. त्यामुळे या कामाचा निधी गेला कुठे असा देखील सवाल या नंतर उपस्थित होत आहे. या ठिकाणी डेपो मॅनेजर याना भेटण्यासाठी येणाऱ्या लोकांना या चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. तर आता तरी ही चिखलमाती दूर करावी, अशी मागणी होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:12 29-05-2025