रत्नागिरी : वाहनाचा विमा नसेल तर असे वाहन स्वतः चालविणे किंवा अन्य व्यक्तीला चालवायला देणे हा गुन्हा आहे. विमा नसलेल्या वाहनाचा अपघात झाल्यास त्या वाहनाला भरपाई मिळत नाही. किंवा त्या वाहनाकडून गुन्हा घडल्यास शिक्षा होऊ शकते.
वाहन विम्याचे प्रकार किती ?
सर्वसमावेशक विमा : सर्वसमावेशक विमा आपल्या वाहनाचे नुकसान आणि तिसऱ्या व्यक्तीला होणारे नुकसान असे दोन्ही कव्हर करते.
तृतीय पक्ष विमा : तृतीय पक्ष किंवा थर्ड पार्टी विमा केवळ तिसऱ्या व्यक्तीला होणारे नुकसान भरून काढतो.
दुचाकी विमा : टू-व्हीलर इन्शुरन्समध्ये अपघात, आपत्ती, आग, चोरी आदींमुळे होणारे नुकसान तसेच थर्ड-पार्टीला होणारे कोणतेही नुकसान आणि दुखापत यासाठी कव्हर दिले जाते. हे मालक आणि गाडी चालवत असणाऱ्यासाठी अनिवार्य आहे.
अपघाताच्या स्वरूपानुसार शिक्षा
विना इन्शुरन्स वाहनाने अपघात केल्यास त्या अपघाताच्या स्वरूपावर वाहनचालक किंवा मालक याच्यासाठी शिक्षेची तरतूद आहे.
अपघात झाला तर?
विना इन्शुरन्स प्रवास करणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्यास त्या वाहनाला नुकसान भरपाई शासनाकडून दिली जात नाही. किंवा त्या वाहनाने अपघात केला तर त्याच्या स्वरूपावरून दंडात्मक किंवा अगदी कारावासाची शिक्षा होऊ शकते.
२७९ जणांवर कारवाई चार महिन्यांत
वाहनाचा विमा नसतानाही वाहन चालविणाऱ्या २७९ जणांवर जानेवारी ते एप्रिल २०२५ या कालावधीत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. विमा असल्यास अपघात झाला तर आपल्या आणि समोरच्या वाहनाच्या नुकसानाची रक्कम शासनाकडून दिली जाते.
वाहनाचा विमा असेल तर अपघात झाल्यास स्वतःच्या तसेच समोरच्या वाहनाच्या नुकसानाची भरपाई मिळते. मात्र, विमा नसताना अपघात केल्यास त्या वाहनाची नुकसान भरपाई मिळत नाहीच, पण समोरच्या वाहनाच्या नुकसानाची भरपाई द्यावी लागते. त्यामुळे प्रत्येक वाहन मालकांनी वाहनाचा विमा काढावा, त्याची प्रत प्रवासादरम्यान सोबत ठेवावी- राजवर्धन करपे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 29/May/2025














